चिपळूण नगरपालिकेचा थकबाकीदारांना झटका
चिपळूण नगरपालिकेचा थकबाकीदारांना झटका चिपळुणात दोन दिवसात मालमत्ता जप्तीची कारवाईआपल्या वसुलीची टक्केवारी वाढविण्यासाठी चिपळूण नगर परिषद २ दिवसात मोठ्या थकबाकीदारांना झटका देणार आहे. त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाणार असून त्याची तयारी सध्या सुरू आहे. आतापर्यंत पाणी व घरपट्टीची मिळून १० कोटी २४ लाख ९१ हजार ८०५ रूपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे वसुलीचे प्रमाण ६१ टक्के झाले आहे. थकबाकी असलेल्या ५० जणांची नळकनेक्शन तोडण्यात आली आहेत.नगर परिषदेला मालमत्ता करातून चालू व थकित मिळून सुमारे १५ कोटी ३९ लाख २७ हजार ५८३ रुपये, तर पाणीपट्टी करातून चालू वर्षी व मागील थकबाकी मिळून सुमारे २ कोटी ४५ लाख ८८ हजार १३३ रूपये येणे अपेक्षित आहे.www.konkantoday.com