
ग्रुपग्रामपंचायत तोणदेमधील बागपाटोळे गावातील विहीर कामातील ९८ हजाराच्या वसुलीचे आदेश
रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तोणदेमधील बागपाटोळे गावातील राष्ट्रीय पेयजल अंतर्गत विहीर कामाच्या तक्रारीमुळे झालेल्या चौकशीत जिल्हा परिषद प्रशासनाच्या अभिप्रायानुसार अनियमितता आढळून आली आहे. याबाबत संबंधित तत्कालीन उपअभियंता व सहायय्यक अभियंता यांच्याकडून जादा अदा केलेली ९८ हजार ४४१ रू. ही रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच अनियमिततेबाबत संबंधितांवर तत्काळ कारवाई करून तसा अहवाल या कार्यालयाकडे विनाविलंब सादर करावा, असे जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तोणदेमधील बागपाटोळे गावात राष्ट्रीय पेयजल अंतर्गत विहिरीच्या कामाची चौकशी लावण्यात आली होती. www.konkantoday.com