
कोकणातील समुद्रकिनार्यांवर कासव महोत्सव, पर्यटनाला नामी संधी
कोकणातील आंजर्ले परिसरातील समुद्र किनार्यावर कासव महोत्सव २८ मार्चपासून सुरू होणार आहे. लाटांवर स्वार होण्यासाठी किनार्यावरील रूपेरी वाळूतून दुडुदुडु धावत निघालेली कासवांची पिल्ले पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होणार असून ३० एप्रिलपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे.कोकणातील समुद्र किनार्यावर ऑलिव्ह रिडले जातीची कासव नोव्हेंबर ते मार्चदरम्यान अंडी घालण्यासाठी किनार्यावर येतात. कासवांमध्ये पालकत्व नसते. मादी अंडी घालून निघून गेल्यावर काही दिवसानंतर त्या अंड्यातील पिल्ले बाहेर पडून ती थेट समुद्राच्या दिशेने धावत निघतात. होळीनंतर राज्यभरातील कासव प्रेमींना कासव महोत्सवाची ओढ लागते. महोत्सवाच्या तारखा कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष असते. दरम्यान कासव, कासव-मित्र संघटनेचे तृशांत भाटकर यांनी २८ मार्चपासून कासव महोत्सव सुरू होणार असल्याचे सांगितले.www.konkantoday.com