उंबर्लेतील गाढवकातळ येथे सापडलेल्या एलियनसदृश्य कातळशिल्पाच्या डोक्यावर सेट टॉप बॉक्सच्या चित्राने उत्सुकता वाढली
दापोली तालुक्यातील उंबर्लेतील गाढवकातळ येथे सापडून आलेल्या व तरूण भारत संवादने प्रकाशात आणलेल्या जगातील एकमेव अशा एलियनसदृश्य कातळशिल्पाच्या डोक्यावर सेट टॉप बॉक्स सदृश्य चौकोनी वस्तू आढळून आली आहे. या बॉक्सवर अँटेनादेखील जोडलेला दिसत आहे. यामुळे कातळशिल्पाचा सखोल अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत कुर्धे येथील कातळशिल्प अभ्यासक ए. के. मराठे यांनी व्यक्त केल.कुर्धे येथील कातळशिल्प अभ्यासक मराठे यांनीही नुकतीच या कातळशिल्पाला भेट दिली. मराठे यांनी या कातळशिल्पाची बारकाईने पाहणी केली असता त्यांना या कातळशिल्पाच्या डोक्यावर सेट टॉप बॉक्ससदृश्य एक चौकोनी वस्तू आढळली. या सेट टॉप बॉक्ससदृश्य वस्तूवर एक ऍन्टीना जोडलेला आहे. या ऍन्टीनाला पुढे जावून दोन फाटे फुटले आहेत. ऍन्टीनाच्या सहाय्याने या सेट टॉप बॉक्स सदृश्य वस्तूमध्ये काही संदेश येत होते का? की हा एलियनसदृश्य माणूस हे संदेश बाहेर पाठवत होता? याबाबत सखोल अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत मराठे यांनी व्यक्त केले. www.konkantoday.com