सांगलीच्या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर,महाविकास आघाडीत नाराजी
ठाकरे गटाने आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात 17 जागांवरचे उमेदवार जाहीर केले आहेत. यात सांगलीच्या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे.यावरून महाविकास आघाडीत नाराजी पाहायला मिळतेय. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते वरिष्ठांना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. सांगली लोकसभा मतदार संघाचा तिढा दिल्लीच्या दारी आल्याचं पाहायला मिळतंय. विश्वजित कदम आणि सांगली काँग्रेसचं शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालंय. आज दुपारी घेणार पक्षश्रेष्ठींची हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर केल्याने काँग्रेस नेते नाराज आहेत.आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील दिल्लीत पोहचले आहेत. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात जाऊन मल्लिकार्जुन खर्गे आणि केसी वेणूगोपाल यांची भेट घेणार आहेत. सोनिया गांधी यांची संध्याकाळीपर्यंत भेट होणार आहे. वरिष्ठांच्या भेटीनंतर विश्वजीत कदम चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळण्यावर सांगलीतील काँग्रेसचे नेते ठाम आहेत. सोनिया गांधींच्या भेटीनंतर सांगलीत उद्या येऊन काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी माहिती दिली आहे.www.konkantoday.com