शिमगोत्सवासाठी चिपळूण आगारातून ६० हून अधिक जादा एसटी बसेस
कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या शिमगोत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू झाली आहे. पुणे, मुंबईहून हजारो चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. तर अजूनही अनेकजण गावाच्या दिशेने येत आहेत. शिमगोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी चिपळूण आगारातून ६० हून अधिक एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले असून या सर्व बसेस आरक्षित झाल्या आहेत. या बसेस दि. ३१ मार्चपर्यंत विविध मार्गावर धावत आहेत.www.konkantoday.com