
लोटे एमआयडीसी मधील पुष्कर केमिकल् अँन्ड फर्टिलायझर या कँपनी मध्ये एक कामगार बेशुद्ध पडून मृत्युमुखी
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मधील पुष्कर केमिकल् अँन्ड फर्टिलायझर या कँपनी मध्ये एक कामगार बेशुद्ध पडून मृत्युमुखी पडला ही घटना सोमवारी दुपारी ०१.४५ वा.चे सुमारास घडलीविरेंद्र रामजी यादव वय ४७ वर्ष रा. भटवली खुर्द देवरिया राज्य उत्तरप्रदेश असे त्या मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे यातील मयत हा कामावर असताना तेथे चक्कर येऊन बेशुद्ध पडला म्हणून त्यास उपचारासाठी घरडा हॉस्पीटल लवेल ता. खेड. येथे घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून तो मयत झाला असल्याचे घोषित केले या प्रकरणी येथील पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहेwww.konkantoday.com