लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; राजन विचारे चंद्रहार पाटील यांना संधी


लोकसभा निवडणुकीची पहिली यादी शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केली आहे. सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तर ठाण्यातून राजन विचारेंना संधी देण्यात आली आहे.
आज यादी जाहीर होईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी एक्स वर यादी पोस्ट करत लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर केले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाकडून १७ नावं जाहीर

१) नरेंद्र खेडकर-बुलढाणा
२) संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम
३) संजोग वाघेरे पाटील-मावळ
४) चंद्रहार पाटील-सांगली
५) नागेश आष्टिकर-हिंगोली
६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजी नगर
७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
९) राजाभाऊ वाजे-नाशिक
१०) अनंत गीते-रायगड
११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी
१२) राजन विचारे-ठाणे
१३) अनिल देसाई- मुंबई दक्षिण मध्य
१४) संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य
१५) अरविंद सावंत-मुंबई दक्षिण
१६) अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य
१७) संजय जाधव-परभणी

अशी १७ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. संजय राऊत यांनी आज सकाळी यादी जाहीर होईल हे स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आजच सकाळी यादी जाहीर करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी यादी पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.

आणखी चार ते पाच नावं जाहीर होणार?

अद्याप चार ते पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागांवरील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांच्या वतीनं मिळत आहे. अशातच ठाकरेंकडून कल्याणच्या जागेसाठीही अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याणमध्ये महायुतीकडून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जवळपास निश्चित आहे. श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. पुढच्या यादीत केदार दिघेंचं नाव असणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button