लांजा येथे एका चाकरमान्याचा कोंडीत बुडून मृत्यू
लांजा तालुक्यातील भडे तोरस्करवाडी येथील ५० वर्षीय चाकरमानी प्रौढाचा कोंडीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.भडे तोरस्करवाडी येथील असलेले बाळकृष्ण पांडुरंग तोरस्कर (५०) त्यांना दारूचे व्यसन असल्याने सोमवारी सायंकाळपासून दारू पित होते. दुपारी १ वा. दरम्याने ते घरातून बाहेर पडले होते. रात्री घरी न आल्याने त्यांचाा आजुबाजूला शोध घेण्यात आला. मात्र ते कुठेच आढळून आले नाहीत. मंगळवारी सकाळी पुन्हा त्यांचा शोध घेत असता भडे तोरस्करवाडी ते पिंपळवाडी येथील कातकोंड पर्या येथील ल्हाव कोंड येथे कोंडीच्या बाहेर त्यांच्या चप्पल दिसून आल्याने त्यांच कोंडीत पाय घसरून पाण्यात पडले तर नसावेत ना अशी शंका शोध घेणार्या ग्रामस्थांना आल्याने त्यांनी कोंडीत शोध घेतला असता कोंडीत त्यांचा रूतरेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. www.konkantoday.com