रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले*
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. 29 मार्चपासून लोकसभा मतदार संघात खळा बैठकांच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार आहेत.29 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान सहाही विधानसभा मतदार संघात खळा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अर्थात इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराला दिमाखात सुरुवात झाली आहे. खासदार विनायक राऊत यांनी जनसंपर्कावर भर दिला असून गावागावात जाऊन ते ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.www.konkantoday.com