रत्नागिरी जिल्ह्यातील उबाठा गटाचे नेते राजेंद्र महाडीक यांना बढती
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विद्यमान जिल्हा सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांना बढती देण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या संपर्क प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाकडून राजेंद्र महाडीक यांच्याकडे ही फार मोठी जबाबदारी देवून पक्षाने त्यांच्यावर फार मोठा विश्वास दाखविला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.www.konkantoday.com