
माकडे पकडण्याची मोहीम कागदोपत्री ,आंबा बागातदारांचे मोठे नुकसान
*__रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर माकडांचा त्रास सहन करावा लागत आहे पावस व गोळप परिसरामध्ये वानर, माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासनाने जिल्हा वार्षिक नियोजनातून त्यांना पकडण्यासाठी निधी प्राप्त करून दिला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाहीत्यामुळे ऐन आंबा आणि काजू हंगामामध्ये वानर, माकडांचा उपद्रव प्रचंड वाढल्याने बागायतदारांचे नुकसान होत आहे.वानर, माकडांचा उपद्रव थांबवण्यासाठी शासनस्तरावर अनेक निवेदने व उपोषणे करण्यात आली. त्यानंतर वानर, माकडे पकडण्यासाठी व त्यांना जंगलात सोडण्यासाठी निधीही मंजूर झाला. वनविभागातर्फे या भागातील वानर, माकडांना पकडण्याचे प्रात्यक्षिकही झाले; परंतु त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऐन आंबा आणि काजू हंगामात वानराकंडून होणाऱ्या उपद्रवामुळे बागायतदार, शेतकरी हैराण झाले आहेत. वानर, माकड पकडण्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू नसल्यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. तयार झालेला आंबा वानर आणि माकडे उड्या मारून खाली पाडतात. खाली पडलेल्या फळांचा उपयोग काहीच होत नसल्याने प्रचंड नुकसान बागायतदारांना सहन करावे लागत आहेwww.konkantoday.com