पंकजा मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली
_पंकजा मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली. यावेळी मराठा आंदोलकांकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या गाडीच्या समोर येऊन काही मराठा आंदोलक घोषणा देत होते.पोलिसांनी आंदोलकांना समजावल्यानंतर सुद्धा आंदोलन काही केल्या मागे हटायला तयार नव्हते. म्हणून अखेर पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करत आंदोलकांना बाजूला करावे लागले. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.पंकजा मुंडे या भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत. पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली असून मतदारसंघातील भेटीगाठी वाढवल्या आहेत. केज तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान त्यांना मराठा आंदोलकांनी अडवलं.केज तालुक्यातील औरंगपूर येथे पंकजा मुंडे या पावनधाम येथील सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांना त्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखलं. तेव्हा पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.www.konkantoday.com