नागपूर-मडगांव रेल्वेखाली प्रौढाचा मृतदेह सापडला, रेल्वेतून पडला असण्याची शक्यता
कोकण रेल्वे मार्गावरील वालोपे रेल्वे स्थानक येथे नागपूर मडगाव रेल्वेखाली प्रौढाचा मृतदेह सापड्याची घटना दि. २४ मार्च रोजी सकाळी ११.१४ वा. घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.भालचंद्र अनंत कापडी (४८, रा. माखाडी टेकडी, बारादेवी परेल व्हीलेज, मुंबई) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची खबर वालोपे रेल्वे स्टेशन येथील आरपीएफ कॉन्स्टेबल यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरपीएफ कॉन्स्टेबल यांना रविवारी सकाळी स्टेशन मास्तर यांनी फोनद्वारे नागपूर-मडगांव ट्रेनखााली एक व्यक्ती जखमी अवस्थेत रूळावर पडलेला असल्याची कल्पना दिली. त्यानुसार त्यांनी तेथे जावून पाहणी केली असता ती व्यक्ती मयत स्थितीत आढळून आली. अधिक तपास पोलीस करीत आहेत. www.konkantoday.com