
दापोली तालुक्यातील धानकोलीचा बेपत्ता तरूण ३६ दिवसांनी सापडला
दापोली तालुक्यामधील धानकोली वेळवी येथून बेपत्ता झालेला तरूण आश्चर्यकारकरित्या सापडला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सिद्धार्थ मर्चंडे हा ४४ वर्षीय तरूण बेपत्ता झाल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली होती.दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ हा धानकोली येथे रहायला होता. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी घरात कोणालाही काहीही न सांगता तो निघून गेला. सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. म्हणून आजुबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेण्यात आला. तो कोठेही आढळून न आल्यामुळे त्याचा भाऊ संतोष मर्चंडे याने दापोली पोलिसांत सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर तब्बल ३६ दिवसांनी २३ मार्च रोजी तो गावातील नदीपात्रात आढळला. सिद्धार्थ हा मानसिक रूग्ण असल्यामुळे तो जंगलामध्ये भटकत राहिलेला असण्याची शक्यता संतोष मर्चंडे यांनी व्यक्त केली. www.konkantoday.com