चिपळूण येथे अज्ञात कारणावरून दाम्पत्याने आत्महत्या केल्याने खळबळ
चिपळूण शहरात एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली. यापैकी पत्नीचा मृतदेह चिपळूण शहरानजिकच्या खेर्डी येथील नदीपात्रात तर पतीचा मृतदेह पिंपणी येथे त्याच्या घरी आढळून आला. कारण स्पष्ट नसून पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत.शरद शिवगोंड पाटील (४२), स्वाती शरद पाटील (४०, रा. दोघेही सध्या पिंपळी, मूळ कोल्हापूर) असे या दाम्पत्याचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शरद पाटील, स्वाती पाटील हे दोघेही काही दिवसांपासून पिंपळी येथे भाड्याने रहात होते. शरद पाटील यांना अपंगत्व आल्याने ते घरीच होते. अज्ञात कारणातून त्यांनी घरीच विष प्राशन करून आत्महत्या केली. तसेच पत्नीने वाशिष्ठी नदीत उडी घेवून आत्महत्या केली.www.konkantoday.com