खळबळजनक! अयोध्येच्या राम मंदिर परिसरात गोळी लागल्याने पीएसी कमांडो जखमी, प्रकृती गंभीर


अयोध्येतील अतिसंवेदनशील रामजन्मभूमी मंदिर परिसरात मंगळवारी ड्युटीवर असलेल्या पीएससी कमांडो गोळी लागून जखमी झाला. त्याच्या छातीत गोळी लागली असल्याची माहिती असून या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी जखमी कमांडोला लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये भरती केले आहे. या कमांडोची प्रकृती चिंताजनक आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केल आहे. ही घटना चुकून झाली असल्याचे पोलिस अधीक्षकांनी म्हटले आहे. मात्र, हा गोळीबार नेमका कसा झाला या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. पीएसी कॅम्पमधून पोलिसांना जोरदार गोळीबाराचा आवाज आला. यात पीएसी कमांडो ३२ बटालियनचे रामप्रसाद (वय ५०, रा. जैस, अमेठी) हा जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हे पाहून कॅम्पसमध्ये एकच गोंधळ उडाला. एसपी सिक्युरिटी पंकज पांडे यांनी जखमी कमांडोला तातडीने श्रीराम हॉस्पिटलमध्ये नेले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने तात्काळ दर्शन नगर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आले, मात्र, त्याची गंभीर प्रकृती पाहता त्याला डॉक्टरांच्या पथकाने लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये भारती केले. गोळी ही छातीच्या डाव्या बाजूला लागली आहे.

रामजन्मभूमी पोलिस स्टेशनचे एसओ देवेंद्र पांडे यांनी सांगितले की, कमांडो रामप्रसाद आपली एके-४७ रायफल साफ करत असताना अचानक गोळी झाडली गेली ही गोळी त्याच्या छातीत घुसल्याने कमांडो गंभीर जखमी झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button