कोतवडे खूनातील संशयित आरोपीस जामीन मंजूर
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील दिलीप रामाणे यांच्या खूनातील आरोपीची सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. विनायक उर्फ नानू नारायण भोसले (५०, रा. भोसलेवाडी, कोतवडे) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर कोतवडे येथील दिलीप रामाणे याचा खून केल्याचा आरोप दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून नानू भोसले याला अटक करण्यात आली होती.www.konkantoday.com