राजापूर बाजारपेठेतील अतिक्रमण विरोधात नगर परिषद कारवाई करणार
राजापूर शहर बाजारपेठेतीलल रस्त्यांवर व्यापार्यांनी केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेला असताना आता नगर परिषद प्रशासनही अतिक्रमणविरोधात ऍक्शन मोडवर आले आहे. व्यापार्यांनी रस्त्यावर केलेली अतिक्रमणे तत्काळ काढून टाकावीत अन्यथा कोणत्याही क्षणी नगर परिषदेकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्यावतीने नोटीसीद्वारे देण्यात आला आहे.राजापूर शहरामध्ये जवाहर चौकातून मुख्य बाजारपेठेत गेलेला रस्ता हा अत्यंत अरूंद आहे. अशातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला समोरासमोर स्थानिक व्यापार्यांची दुकाने आहेत. बाजारपेठेत फळ विक्रेते, भाजी विक्रेते, किराणा माल विक्रेते व अन्य दुकाने तसेच लोकवस्ती आहे. बाजारपेठेतील या रस्त्यांवर काही व्यापार्यांनी दुकानांसमोरील रस्त्यांवर स्वतःच्या दुकानातील सामान ठेवले असून दुकानांवरती कागद व पत्र्यांच्या झडया बांधल्या आहेत. www.konkantoday.com