स्वातंत्र्य वीर सावरकर’ ह्या चित्रपटाच चार दिवसांत चित्रपटाचं एकूण कलेक्शन ८.७ कोटी रुपये झालं
_रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका असलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट वीर सीवरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना प्रेक्षकांसमोर मांडणारा हा चित्रपट शुक्रवारी (२२ मार्च रोजी) सिनेमागृहांमध्ये हिंदी व मराठी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.रणदीप हुड्डाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १.०५ कोटी रुपये कमावले होते, तर शनिवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी व तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने दोन्ही दिवसांपेक्षा जास्त २.७ कोटी रुपयांची कमाई केली. प्रारंभिक आकडेवारीनुसार, धुलीवंदनच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी चित्रपटाने २.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.www.konkantoday.com