लांजा धुंदरे दाभोळ मार्गावर अज्ञात वाहनाची धडक बसून दोन उदमांजराचा मृत्यू
_लांजा धुंदरे दाभोळ मार्गावर अज्ञात वाहनाची धडक बसून मृत झालेली दुर्मिळ प्रजातीमधील दोन उदमांजरे असल्याचे स्पष्ट झालेआहे. दरम्यान वन विभागाने या दुर्मिळ प्राण्यांना चिरडणाऱ्या वाहनाचा शोध सुरू केला रविवारी २४ मार्च रोजी लांजा धुंदरे दाभोळ मार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या सदृश दोन प्राण्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. दोन दुर्मिळ प्राण्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यावर वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन कोणता प्राणी असावा, यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे माहिती अहवाल मागवला होता. वनपाल दिलीप आरेकर यांनी सकृतदर्शनी रानमांजराची पिल्ले असण्याची शक्यता वर्तविली होती. पशुसंवर्धन अधिकारी श्रीमती प्राजक्ता बर्वे, वनरक्षक श्री. वाघाटे यांनी मृत दोन प्राण्यांचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यात आले. हे दुर्मिळ असे उदमांजर असल्याचे स्पष्ट झाले.www.konkantoday.com