
जीएसटी कर थकविणार्या व्यापार्यांवर अटकेची तरतूद करणारा कायदा येणार
रत्नागिरी ः जीएसटी कराद्वारे शासनाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे जीएसटी कायद्यांतर्गत बिलाशिवाय विक्री करणे, विक्री न करता बिल देणे, चुकीचे कर परतावे मिळवणे व जमा केलेले कर सरकारला न भरणे यासाठी व्यापार्याला अटक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या संदर्भात अटकेच्या तरतुदीचे पुनवरालोकन करण्यासाठी त्रिसदस्यीय खंडपीठाकडे हा विषय वर्ग केला आहे. त्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय होणार आहे अशी माहिती सी.ए. प्रसाद आचरेकर यांनी रत्नागिरीत आयोजित केलेल्या सी.ए. इन्स्टिट्यूटच्या कार्यशाळेत दिली