
रत्नागिरी आणि सावंतवाडीकरिता वेगळ्या गाड्यांची मागणी,सकारात्मक प्रतिसाद
*कोकणातून दक्षिणेत जाणाऱ्या गाड्या नेहमीच भरलेल्या असतात. त्यामुळे कोकणच्या लोकांना प्रवास करताना धक्के सहन करावे लागतात. रत्नागिरी ते सावंतवाडीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. हा प्रश्न हुसेन दलवाई यांनी राज्यसभा सदस्य असताना अनेकवेळा उपस्थित केला होता. रत्नागिरी आणि सावंतवाडीकरिता वेगळ्या गाड्यांची मागणी केली होती; परंतु त्याबाबत अजूनही निर्णय झाला नाही, असे दलवाई यांनी सांगितले. गणेशोत्सव, दिवाळी आणि होळीच्या सणाला असंख्य लोक कोकणात जात असतात त्या वेळी त्यांची पंचाईत होते. या संबंधीची बाजू दलवाई यांनी कोकण रेल्वेकडे मांडली असता त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अधिकच्या गाड्या सोडण्यात येणार असल्याचे मुख्य ऑपरेशन मॅनेजर वी. सी. सिन्हा यांनी पत्राद्वारे कळवले आहे.