माखजन बस स्थानकात ना ऑफलाईन ना ऑनलाईन आरक्षण सुविधा, केवळ आरक्षणाचा बोर्ड

संगमेश्वर तालुक्यातील माखजन बसस्थानकात आरक्षणाचा बोर्ड आहे.पण कोणत्याच एसटी बस चे आरक्षण मिळत नसल्याने माखजन बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची निराशा होत आहे माखजन बस स्थानकातून पुणे,बोरिवली,मिरज अशा लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात.तर हंगामी मुंबई साठी देखील गाड्या सुटतात.या सगळ्या बसेस च आरक्षण बसस्थानकात मिळत असे.परंतु कालपरत्वे ऑनलाईन बुकिंग व्यवस्था सुरु झाल्यावर,माखजन बसस्थानकात ऑफलाईन बुकिंग सेवा बंद झाली.बदलत्या तांत्रिक सोयीसुविधांचा विचार करता माखजन बसस्थानकात ऑनलाईन बुकिंग मिळणे गरजेचे होते.परंतु माखजन बस स्थानकात ना ऑफलाईन ना ऑनलाईन आरक्षण सुविधा उपलब्ध आहे.माखजन परिसर हा ग्रामीण भाग असून सगळ्या गावात मोबाईल नेटवर्क च्या चांगल्या सुविधा नसल्याने ऑनलाईन आरक्षण मिळवण्यात अडचणी येतात.शिवाय वयोवृद्ध नागरिकांना ऑनलाईन तिकीट काढण्याच्या पद्धती अवगत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणी चा सामना करावा लागत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button