महाराष्ट्र खो-खो महिला संघामध्ये रत्नागिरीच्या पायल पवार, अपेक्षा सुतारची निवड
_भारतीय खो-खो महासंघाच्यावतीने दिल्ली येथे २८ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या ५६व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो महिला संघामध्ये रत्नागिरीच्या पायल पवार, अपेक्षा सुतारची निवड झाली आहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ स्पर्धेसाठी दिल्ली येथे रवाना होणार आहेत.महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना भारतीय महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरूण देशमुख, माजी सचिव संदीप तावडे यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे के. के. एम. कॉलेज, मानवत जि. परभणी येथे राष्ट्रीय स्पर्धापूर्व सराव शिबिर झाले. यामध्ये खेळाडूंनी कसून सराव केला असून ते अजिंक्यपद खेचून आणतील, अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र संघात रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू पायल आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अपेक्षा सुतार या दोघींना राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. www.konkantoday.com