ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता
मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.कारण, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीत माझं नाव असणे किंवा नसणे महत्वाचे नाही. ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम मी करणार असल्याची भूमिका अंबादास दानवे यांनी स्पष्ट केली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपण ठाकरेंची शिवसेना सोडणार नसल्याचे देखील अंबादास दानवे म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यासाठी खैरे आणि दानवे इच्छुक आहेत. तर, खैरे यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दानवे यांनी देखील उमेदवारीवर दावा केला होता. तसेच दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका देखील केली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी थेट पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न झाले. मात्र, आता दानवे यांनी एक पाऊल मागे घेतले असून, पक्षाकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे खैरे-दानवे वाद संपला असल्याची चर्चा आहेwww.konkantoday.com