आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत गाव सांबरेवाडी येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न.

प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत आरोग्य उपकेंद्र धामणसे येथे गाव सांबरे वाडी मध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी समता फाउंडेशन मुंबई व प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व मोतीबिंदू सदृश्य रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये गावातील 43 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली पैकी आठ नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले सदर रुग्णांचे पुढील आठवड्यात शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत यावेळी आरोग्य केंद्र मालगुंड यांच्यावतीने असांसर्गिक आजारांसाठी तपासणी करण्यात आली त्यामध्ये रक्त, बीपी, शुगर, वजन, उंची, इत्यादी तपासणी करण्यात आली सदर शिबिरामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या वतीने डॉ. मैथिली यांनी नेत्र तपासणी केली तसेच आरोग्य उपकेंद्र धामणसेच्या समुदाय आरोग्य अधिकारी यांनी नागरिकांची एनसीडी साठीची तपासणी केली हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव व डॉ. सुनिता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या साठी आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी प्रयत्न केले यावेळी आरोग्य सेविका श्रीम. जयश्री सावंत, समुदाय आरोग्य अधिकारी श्रीम. गीतांजली मायशेटे डॉ. मैथिली मेहतर समता फाउंडेशन चे श्री नितेश शेटे तसेच आशा सेविका श्रीम. जाधव, श्रीम. ईरमल ग्रामपंचायत सदस्य श्री राऊत हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button