कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी रस्ता उखडणारा ट्रेलर रोखला

_कणकवली नगरपंचायत गार्बेज डेपो मधील कचरा प्रकल्पाच्या कामाकरिता आणलेल्या पोकलॅण्ड टाईपच्या बायोमायनिंग मशीन गार्बेज डेपो वरील डांबरी रस्त्यावरून नेल्याने या रस्त्याची पूर्णता वाताहात झाली. बाब माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह त्यांच्या सहकारी माजी नगरसेवकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही मशीन मुंडेश्वर मैदानावर रोखून धरली. जोपर्यंत नगरपंचायतच्या नुकसानी बाबत नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांशी लेखी कागद होत नाही. तोपर्यंत मशीन येथून हलू देणार नाही असा इशारा श्री. नलावडे व हर्णे यांनी दिला.दरम्यान यानंतर संबंधित मशीन चालकाने मशीन थांबवतो अशी ग्वाही दिली. याबाबत माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष यांनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करत याबाबत संबंधित ठेकेदाराला बोलावून घेत नगरपंचायतच्या नुकसानीची भरपाई करून घ्या अशी मागणी केली. कणकवली गार्बेज डेपोवर कचरा प्रकल्पाकरिता पोकलँड टाईप रोलिंग चेन असलेली बायोमायनिंग मशीन आणण्यात आली होती. मुडेश्वर मैदानापर्यत ही मशीन ट्रेलरमधून गार्बेज डेपो पर्यत नेण्याची गरज होती. मात्र ट्रेलर या गार्बेज डेपोपर्यंत जात नसल्याने या पोकलेन टाईप बायोमायनिंग मशीन रस्त्यावरूनच नेण्यात आली. या मशीनच्या चाकांना असलेल्या लोखंडी बेल्टमुळे संपूर्ण डांबरी रस्ता उखडून गेला व यात नगरपंचायतचे मोठे नुकसान झाले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button