अभिनेते लवराज कांबळी यांचे अल्पशा आजाराने निधन
_वस्त्रहरण’ या विक्रमी मालवणी नाटकाचे सुरुवातीच्या काळापासूनचे साक्षीदार असलेले अभिनेते लवराज कांबळी (६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.अखेर मुलुंड येथील राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा आणि सून असा परिवार आहे. मुलुंड येथील स्मशानभूमीत दुपारच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रसाद कांबळीसह नाट्यसृष्टीतील काही मंडळी उपस्थित होती.लवराज आणि अंकुश कांबळी या जुळ्या भावांच्या जोडीने रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत रसिकांचे मनोरंजन केले. या जोडीतील लवराज यांनी मच्छिंद्र कांबळी यांच्या सान्निध्यात राहून रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. ‘वस्त्रहरण’ या नाटकात त्यांनी साकारलेला गोप्या रसिकांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला. www.konkantoday.com