हिरव्या द्राक्षांनी दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला
_होळी निमित्त आयोजिलेल्या द्राक्ष महोत्सवात हजारो हिरव्या द्राक्षांनी दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात साजरा झालेला द्राक्ष महोत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित 2 हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती.यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.www.konkantoday.com