संगमेश्वर तालुक्यात बेकायदा वाळू उपसा आणि वहातुक होत असल्याचा RTI कार्यकर्ते शेखर जोगळे यांचा आरोप
संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी करजुवे, माखजन, कासार कोळवण, आंगवली अशा अनेक ठिकाणी राजरोस वाळू उपसा व वाहतूक होताना दिसत आहे.परंतु याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलेजात असल्याचे लक्षात आले आहे. आंगवली येथील बावनदी पात्रात अनेक वर्षे वाळूमाफियांचा व्यवसाय सुरु आहे असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते शेखर जोगळे यानी केला आहे.एका प्रसिद्धीपत्रकात श्री जोगळे यानी हा आरोप केला आहे. www.konkantoday.com