संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गावी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत राहते घर बेचीराख
संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गावी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत राहते घर पुर्ण बेचीराख झाले असुन ग्रामस्थ्यांच्या प्रसंगाधनाने घरातील महिलेचे प्राण वाचल्याचे बोलले जात आहे. मात्र घराचे मोठे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे.तांबेडी येथे श्रीमती प्रतिभा पांडुरंग भारती यांच्या मालकीचे घर आहे, मात्र त्या वास्तव्यास पुणे येथे असल्याने त्यांचे गावचे घर बंद असते, मात्र शिमग्यासाठी प्रतिभा भारती या दोन दिवसापुर्वी गावी आल्या होत्या, शनिवारी मध्यरात्री एक च्या सुमारास श्रीमती प्रतिभा यांना आपल्या घराला अचानक आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडओरड केली. शेजारील ग्रामस्थानी भारती यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी पुर्ण घराला आगीने वेढा दिल्याचे दिसलें. त्याच वेळी श्रीमती भारती घरात अडकल्याचे दिसताच ग्रामस्थानी मोठ्या धाडसाने त्यांची सुखरूप सुटका केली.मात्र श्रीमती भारती यांचे पुर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले, ची खबर महसूल विभागाला देण्यात आली; त्यानंतर तांबेडी गावचे तलाठी श्री, विठ्ठल सराई यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला. पुर्ण घरासह घरातील सामान पुर्ण जळून गेल्याचे पंचनाम्यात नोंद करुन सुमारे तीन लाख ऐंशी हजाराचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे.www.konkantoday.com