
शिवसेना ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांच्या नावाची यादी उद्या जाहिर करणार
शिवसेना ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांच्या नावाची यादी उद्या जाहिर करणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.२५) मुंबई येथे सांगितले. डॉ. प्रकाश आंबेशकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ४ जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यांनी तो मान्य करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.खासदार राऊत म्हणाले की, डॉ. प्रकाश आंबेडकर यांना ४ जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी मविआसोबत यावं अशी इच्छा आहे. ज्या जागा त्यांनी मागितल्या होत्या त्या जागा दिल्या आहेत. त्यांना वारंवार विनंती केली आहे. त्यांनी प्रस्ताव मान्य करायला हवा. आता निर्णय घेण त्यांच्या हातात आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.www.konkantoday.com