वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येकाही व्यापारी हापूसच्या पेटीच्या आड इतर जातीचे आंबे विकून करत आहेत फसवणूक
*वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात दाखल झाला असताना काही व्यापाऱ्यांकडून इतर जातीच्या आंब्यांची हापूसच्या नावाने विक्री केली जात आहे.त्यामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी बाजार समितीने अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.कोकणातील हापूस आंब्यांच्या सरासरी ३५ ते ४० हजार पेट्या दररोज बाजार समितीत येत आहेत. तर अन्य राज्यातून आंब्याच्या १० ते १२ हजार पेट्या येत आहेत. सध्या हापूसला चढादर असताना ग्राहकांकडून मागणी अधिक आहे. अशातच काही व्यापाऱ्यांकडून हापूसच्या पेटीच्या आड इतर जातीचे आंबे विकले जात आहेत.मुंबईतून एपीएमसीत आंबे खरेदीसाठी आलेल्याना पेटीत हापूस आंबे असल्याचे सांगत हलक्या दर्जाचेच आंबे विकले गेले होते. ही बाब लक्षात येताच त्यांनी आंबे खरेदी केलेल्या व्यापाऱ्याकडे पैसे परत मागितले.www.konkantoday.com