मालवण तालुक्यतील प्रसिद्ध तोंडवळी येथील समुद्राच्या बाजूने असलेल्या सुरुबनाला भीषण आग


मालवण तालुक्यतील प्रसिद्ध तोंडवळी येथील समुद्राच्या बाजूने असलेल्या सुरुबनाला (दि. २४) दुपारी भीषण आग आगल्याची घटना घडली. या आगीने सुरुचे बन जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.जंगल वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मालवण व कणकवली, कुडाळ येथील अग्निशामक बंब दाखल झाले.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास स्मशान भूमीच्या बाजूने तोंडवळी सुरुबनाला आग लागली. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आगीचे लोट पसरत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला परंतु आगीची एकूणच तीव्रता आणि त्या तुलनेत आग विझविण्यासाठी कार्यरत असलेले अपुरे मनुष्यबळ यामुळे आगीवर लगेचच नियंत्रण मिळवता येणे कठीण झाले होते. वनविभागाने जेसीबीच्या सहाय्याने जंगलात पसरलेल्या सुरुच्या काड्यांचा खच बाजूला सारत आगरेषा तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, आगीच्या दाहकतेमुळे त्यात वारंवार अडचणी येत होत्या.तोंडवळीत सुरु बनाला लागलेली आग विझविण्यासाठी तीन अग्निशामक बंब गाड्या मालवण, कणकवली, कुडाळ येथून दाखल झाल्या होत्याwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button