मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात आरतीदरम्यान गर्भगृहात आग, पुजार्यांसह १३ भाविक भाजले
_मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात आज (सोमवार) सकाळी भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात पुजार्यांसह १३ भाविक भाजले गेले आहेत.आरतीदरम्यान गुलाल उधळल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. धुलवडीमुळे गर्भगृहात आवरण बसवण्यात आले होते, त्याला आग लागली आणि ती भाविकांच्या अंगावर पडली. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.www.konkantoday.com