
पुन्हा एकदा मला मंत्रिपद मिळेल असा असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केल्यामुळे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता
*__मला राज्यासह देशाची सेवा करण्याची संधी मिळावी असं साकडं मी आई तुळजाभवानीला घातलं आहे. पुन्हा एकदा मला मंत्रिपद मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मोदी यांच्या नेतृत्वात 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांच्या या वक्तव्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मनोज जरांगे पाटील यांच्या या आवाहनावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानीचं दर्शन घेतलं, त्यानंतर ते प्रसारमाध्यमांंशी बोलत होते.मराठा समाजाच्या उमेदवारीनं कुठलाच फरक पडणार नाही, सगळ्यात जास्त मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीसोबत आहे. स्वतः मी 96 कुळी मराठा भारतीय जनता पार्टीसोबत आहे. मराठा समाजाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे एक तर ते उमेदवार उभे करणार नाहीत किंवा केल तरी फरक पडणार नाही, असं म्हणत नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला आहे.www.konkantoday.com