पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी गेल्या अडीच महिन्यांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने १२१ चोरांच्या मुसक्या आवळल्या
पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी गेल्या अडीच महिन्यांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने १२१ चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ४४ लाख रुपयांची चोरीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.रेल्वेची मालमत्ता, प्रवासी सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे आहे. मात्र, रेल्वे प्रवासात होणाऱ्या चोरीच्या घटना काही कमी होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी कंबर कसली आहे.
चोरांवर नजर ठेवण्यासाठी रेल्वे परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लावले आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर ३ हजार ९१२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यात ४८८ कॅमेरा इनबिल्ट फेशियल रिकग्निशन सिस्टिम (चेहरा ओळखणारे) आहेत. या चेहरा ओळखणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून शंभरपेक्षा जास्त गुन्ह्यांचा छडा लावला आहे.
www.konkantoday.com