
निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ.अजित थोरबोले यांच्या संकल्पनेने दापोली आझाद मैदान येथे जिल्ह्यात पहिली मानवी साखळीची रांगोळी
_मतदानापासून कोणीही वंचित राहू नये,यासाठी प्रचार आणि प्रसार करणेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ.अजित थोरबोले यांच्या संकल्पनेने दापोली आझाद मैदान येथे जिल्ह्यात पहिली मानवी साखळीची रांगोळी करुन २६३ दापोली मतदार संघातील मतदारांना मतदानाची जाणीव जागृती करणेत आली.सुमारे दोन हजार विद्यार्थी आणि तालुक्यातील असंख्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी राष्ट्रध्वजासह मानवी साखळी करीत मतदानाची प्रतिज्ञा केली,तिरंगी फुगे सोबत मतदान विषयक घोषवाक्ये आकाशात सोडल्यानंतर अगदी नयनरम्य प्रसंग दिसत होता. नगरपंचायत मुख्याधिकारी IAS अधिकारी डाॅ.जस्मीन, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारीडाॅ.अजीत थोरबले, दापोली तहसिलदार अर्चना बोंबे, मतदान प्रचार आणि प्रसार प्रमुख नोडल आॅफीसर अण्णासाहेब बळवंतराव, सहाय्यक बळीराम राठोड ,नायब तहसिलदार माधूरी शिगवण, शरदकुमार आडमुठे,रणजीत शिराळकर आदिंच्या हस्ते घोषणा लिहिलेले फुगे आकाशात सोडण्यात आले.www.konkantoday.com