
*नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यास येथील जनता विकासाच्या मुद्द्यावर त्यांना नक्कीच पाठिंबा देईल- शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या
_रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही भाजपाकडून नारायण राणे यांचे नाव पुढे येत आहेत तर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत याबाबत अजून वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला नसतानाच शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेतदीपक केसरकर म्हणाले नारायण राणे ही केवळ व्यक्ती नसून ते केंद्रीय मंत्रिमंडळात कोकणातील मंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गसह कोकणात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे. केंद्राचे अनेक प्रकल्प आज त्यांच्यामुळे सिंधुदुर्गात होत आहेत. कोकणातील विकासाची ही गंगा अविरत राहण्यासाठी ते केंद्रात मंत्री असणे आवश्यक आहे. त्यामुळे नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यास येथील जनता विकासाच्या मुद्द्यावर त्यांना नक्कीच पाठिंबा देईल, असा विश्वास देखील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, रुपेश पावसकर आदी उपस्थित होते. दरम्यान, विद्यमान खासदार विनायक राऊत हे दोन वेळा सत्तेत असूनही त्यांना मंत्रिपद दिले गेले नाही. सत्तेत असूनही ते कोणताही विकास करू शकले नाहीत. केंद्रातील कोणताही विकासात्मक प्रकल्प ते आपल्या मतदारसंघात आणू शकले नाहीत. त्यामुळे नारायण राणे लोकसभेत निवडून गेल्यास त्यांचे मंत्रिपद निश्चित असून कोकणच्या विकासासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.www.konkantoday.com