आता राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाज पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार उभा राहणार
_मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी बोलावलेल्या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जरांगे यांनी समाजासमोर दोन पर्याय दिले होते.त्यापैकी दुसऱ्या पर्यायाला सर्वांनी सहमती दर्शवली. त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाज पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार उभा राहू शकतो. विशेष म्हणजे हा उमेदवार मराठा, धनगर, मुस्लिम, दलित या समाजाचाही असू शकतो.बैठकीमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, १७ ते १८ मतदारंसंघांवर मराठ्यांचं वर्चस्व आहे. मात्र सगळे फॉर्म भरत राहिलात तर मतं विखुरले जातील. त्यातून कुणाचंही साधू शकतं. मुळात आपलं लोकसभेत काही अडलेलं नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून एकच फॉर्म जिल्ह्यातून टाकावा. मुख्यमंत्री शिंदे विनाकारण मराठा समाजाच्या नजरेतून उतरायला लागले आहेत, गरज नसताना लाट अंगावर घेत आहेत.आपलं काम राज्य सरकारशी असल्याने आपण विधानसभा निवडणुकीत सरकारला हिसका दाखवू. अजूनही मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतलेले नाहीत, मराठा-कुणबी एकच असताना ओबीसी आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे सरकारला विधानसभेत धडा शिकवायचा आहे.www.konkantoday.com