
रत्नागिरीतील खालची आळी येथे प्रौढाची आत्महत्या
रत्नागिरी : खालची आळी येथे सोमवारी प्रौढाने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती. जितेंद्र तुकाराम खाके (50, रा. खालची आळी, रत्नागिरी) हे गवंडी काम करायचे तसेच त्यांना दारुचे व्यसन होते. गेल्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. परंतु, या बाबत शहर पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नव्हती. सोमवारी दुपारी 3 वा. सुमारास खालची आळी येथील लघु उद्योग वसाहत येथील जंगल वाढलेल्या ठिकाणी राजेंद्र खापे यांच्या घराच्या अर्पूण बांधकामाच्या शिगेला जितेंद्र खाके हे नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवला.