शिवजयंतीनिमित्त रत्नागिरीत निघणार शोभायात्रा
क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरीतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे गुरूवार २८ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त रत्नागिरी शहरामध्ये जयस्तंभ ते मारूती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक तथा शोभायात्रा काढण्यात येणार आहे.या शोभायात्रेला सायंकाळी ५.३० वा. जयस्तंभ येथून प्रारंभ होवून रात्री ९ वाजता मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगता होईल. यामध्ये सर्व मराठा समाजबंधवांनी व शिवप्रेमींनी एकत्र येवून एकतेचे दर्शन घडवावे, अशी मंडळाची अपेक्षा आहे. तरी गुरूवार २८ मार्च रोजी सर्व समाजबांधवांनी दुपारी ३.३० वा. क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी कार्यालय सिद्धीविनायक रेसिडेन्सी बेसमेंट स्टोअर क्र. ३ बी-विंग, गोडबोले स्टॉप, मजगांव रोड येथे पारंपारिक वेशभूषेत एकत्र जमून फेटे बांधून रत्नदुर्ग किल्ल्यावर देवी भगवतीच्या मंदिरात दुचाकीवरून पुरूष व स्त्रियांनी जमावयाचे असून मंदिरातून शिवज्योत घेवून जयस्तंभ येथे यावयाचे आहे. www.konkantoday.com