शिमगोत्सवात पारंपारिक प्रथेनुसार वरवडे खाडीत फिरण्यासाठी गेलेल्याची बोट बुडाली मात्र स्थानिकानीसर्वांना वाचवल्याने मोठा प्रसंग टळला


शिमगोत्सवात पारंपारिक प्रथेनुसार वरवडे खाडीत फिरण्यासाठी गेलेल्याची बोट बुडाल्याची घटना आज दुपारी घडली मात्र स्थानिक ग्रामस्थानी सर्वांना वाचविण्यात यश मिळवले त्यामुळे मोठा प्रसंग टळला
दरवर्षी शिमगोत्सवाला खाडीत सहकुटुंब नौका घेऊन जाण्याची वरवडे खारवीवाडा येथील समाजाची प्रथा आहे. रविवारी असलेल्या होळीनिमित्त वरवडे येथील काही नौका खाडीत उतरल्या होत्या. यातील एक नौका खाडीत बुडाली. या बोटीत एकाच कुटुंबातील जवळपास . 30 माणसे होते बोट उलटताच बोटीतील सर्वांनी एकच आरडाओरड केली. यावेळी आजूबाजूला असलेल्या नौका मालकांनी बचावासाठी धाव घेतली. आजूबाजूला असलेल्या नौकांमधील ग्रामस्थांच्या सहकार्याने बुडालेल्या जवळपास ३० जणांना वाचवण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर, जयगडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कुलदिप पाटील, पोलीस उपनिरिक्षक क्रांती पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याआधीच स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवून या सर्वांना वाचविण्यात यश मिळवले त्यातील काही जणांना मालगुंड प्रा.केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button