
रायगड मतदार संघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक
_रायगड मतदार संघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्यामुळे तेथील खासदार महिला मतदारांवर अवलंबून राहणार आहेत.रायगड जिल्ह्यातील विधानसभेचे एकूण सात मतदार संघ आहेत. त्यात अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, महाड आणि श्रीवर्धन या मतदार संघांचा समावेश होतो तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर असे एकूण सहा विधानसभा मतदार संघ मिळून रायगड लोकसभा मतदार संघ आहे. रायगड लोकसभा मतदार संघात एकूण १६ लाख ५३ हजार ९३५ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या ८ लाख १३ हजार ५१५ आहे तर स्त्री मतदारांची संख्या ८ लाख ४० हजार ४१६ आहे शिवाय ४ तृतीयपंथी मतदार आहेत.www.konkantoday.com