रत्नागिरी जिल्ह्यातील ५९० गावात साडेतीन हजार शेतकऱ्यांची राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतीशी निगडित उपकरणांची खरेदी
__रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीकडे वळवून पारंपरिक भातपिकांबरोबरच अन्य पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना कृषी विभागाकडून राबवण्यात येत आहेत.जिल्ह्यातील ५९० गावात साडेतीन हजार शेतकऱ्यांनी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतीशी निगडित उपकरणांची खरेदी केली. यातून शासनाने त्यांच्या खात्यात ७८ लाखांहून अधिक अनुदान जमा केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन मिळत आहे.www.konkantoday.com