रत्नागिरीतील सुप्रसिध्द श्री देव ज्योतिबा देवस्थानात आज रवि. दि. 24 मार्च रोजी अंतिम खेटा
रत्नागिरीतील सुप्रसिध्द श्री देव ज्योतिबा देवस्थानात आज रवि. दि. 24 मार्च रोजी अंतिम खेटा असून या सोहोळ्याला सर्व भाविकांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन ज्योतिबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजन शेट्ये यांनी केले आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही रवि. दि. 24 मार्च 2024 रोजी स. ठिक 10 वा. या श्री देव ज्योतिबा देवस्थानमध्ये शेवटचा खेटा असून त्यानिमित्ताने भाविकांची पायी दिंडी आयोजित करण्यात आली आहे. ही दिंडी पेठकिल्ला, रत्नागिरी येथील पाथरे बाग येथून सुरु होईल व ती श्री ज्योतिबा मंदिर पर्यंत जाईल.
या दिंडीचा शुभारंभ श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी दरवर्षीप्रमाणे श्री देव ज्योतिबा देवस्थानमध्ये महापुजा संपन्न होईल तसेच सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार असल्याचे श्री. राजन शेट्ये यांनी सांगितले. या दिंडीत सहभागी होण्यासाठी सर्व भक्तगणांनी रवि. दि. 24 मार्च 2024 रोजी स. ठिक 10 वा. पाथरे बाग येथे उपस्थित रहावे असे आवाहन ज्योतिबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजन शेट्ये, उपाध्यक्ष श्री. अजय गांधी, सेक्रेटरी श्री. राधाकृष्ण गांधी, सहसेक्रेटरी श्री. विजय गांधी, सह उपाध्यक्ष श्री. अमोल गांधी, खजिनदार श्री. विनायक शेट्ये तसेच सचिन गांधी, वीरेंद्र वणजू, किरण जाधव, चंदन दळी, मंगेश शेट्ये, सौ. अश्विनी गांधी, ओमकार शेट्ये, सौ. स्वाती शेट्ये यांनी केले आहे.
www.konkantoday.com