
मानधनात कपात,संगणक परिचालकांचा शासनाच्या नावाने शिमगा
_संप कालावधीत शिल्लक राहिलेली कामे संगणक परिचालकांनी करूनसुद्धा नोव्हेंबरच्या मानधनात कपात तर डिसेंबरचे मानधन देवूच नका असे ग्रामविकास विभागाकडून संबंधित कंपनीला सांगण्यात आल्याने संगणक परिचालकांवर ऐन शिमगोत्सवात शासनाने मोठा अन्या केला आहे. त्यामुळे संपकाळातील मानधन द्यावे, अशी मागणी त्यांनी राज्य संघटनेतर्फे केली आहे.आपल्या न्ययाय व हक्कासाठी आपल्या संघटनेच्यावतीने संगणक परिचालकांनी मागील १७ नोव्हेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२४ असे ४५ दिवस कामबंद आंदोलन केले होते. शासनाने त्या काळात कोणत्याही प्रकारची म्हणावी तशी दखल न घेतल्याने कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले होते. www.konkantoday.com