
अन्यथा स्बळावर निवडणुका लढवणार, दापोली रिपब्लिकन पार्टीचा निर्धार
दापोली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक दापोलीत पार पडली. बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा करताना या निवडणुकांमध्ये योग्य प्रतिनिधीत्व न मिळाल्यास स्वबळावर लढवण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रितम रूके यांनी आरपीआय हा महायुतीतील घटक पक्ष असून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना मदत केली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही योग्य सन्मान व समान जागा वाटपाची अपेक्षा आहे. मात्र जर योग्य प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर आरपीआय स्वबळावर निवडुका लढवण्यास मागे हटणार नाही असे स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्राथमिक रणनिती आखण्यात आली. तसेच पक्षाच्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी चाचणी घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.www.konkantoday.com




