चिपळुणात घरफोडीतून २ हजारांंचा ऐवज चोरीस
बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून त्यातून गॅस शेगडी व मिक्सर असा २ हजार २२० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना कळकवणे-ऐनाडवाडी येथे गुरूवारी उघडकीस आली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद आशिष अंकुश शिंदे (कळकवणे-ऐनाडवाडी) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष शिंदे हे त्याचे घर बंद करून नोकरीनिमित्त पुणे येथे गेले होते. असे असताना १४ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने शिंदे यांच्या घराचे हॉलची स्लायडिंग खिडकी उघडून किचनमध्ये असणारी गॅस शेगडी व मिक्सर असा २ हजार २२० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेया फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com